पोस्ट्स

एप्रिल, २०११ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

पोर्तुगीज (राजकीय आक्रमण)

इमेज
पोर्तुगिजांचा गोव्यात शिरकाव व्हाश्कु द गामा (आंतरजालावरून साभार) युरोपिय देशांमधे भारत तसा सुपरिचित होता. विशेषतः विजयनगर साम्राज्यामुळे आणि आशिया खंडातील सुवर्णभूमी म्हणून ओळखला जात असे. अश्या ह्या सुवर्णभूमीशी प्रत्यक्ष संबंध कोणत्या देशाला नको असतील? म्हणुन मग पोर्तुगालच्या राजाने भारतापर्यंत पोचणारी दर्यावर्दी वाट शोधण्यासाठी व्हाश्कु द गामा ह्याला पाठवले (इ. स. १४९८). व्हाश्कु द गामा भारतात यशस्वीरित्या पोचला. म्हणजे वाटेत मिळणार्‍या जहाजांची लूट, जाळपोळ, बायका मुले पळवणे, छोटे देश लुटणे, बाटवाबाटवी अशी यशस्वी कामे करत आला. कालिकतच्या राजाने आधी त्याचा सत्कार केला खरा पण नंतर त्यांचे बिनसले. १२ दिवस राहून तो परत गेला. जाण्यापुर्वी त्याने इथे एक वखार ही स्थापली. परत जाताना मलबारच्या हिंदुंना घेउन गेला, (आता तिकडे नेलं म्हणजे त्यांना ख्रिस्ती बनवणं हे तर ओघाने आलंच) आणि मग परत पाठवुन दिले. (ही पोर्तुगालच्या राजाची वसाहतविषयक धोरणांची नांदी होती.) तसाही, व्हाश्कु द गामा भारतात येण्यापुर्वीच, ख्रिस्ती धर्म बर्‍यापैकी पसरलेला होता. यानंतर ज्या ज्या वेळेला पोर्तुगालची ज

मध्ययुगीन गोवा आणि मुस्लिम आक्रमणे

इमेज
************* इ. स. ९६० मध्ये हळसी चा कदंब राजा कंटकाचार्य याने शिलाहार राजा भीम याच्याकडून गोवा जिंकून घेतला. पण शिलाहारांनी त्याच्याकडून गोवा परत जिंकून घेतला. कंटकाचार्य ऊर्फ षष्ट्यदेव याची पत्नी कुंडलादेवी ही कल्याणी चालुक्यांची कन्या. आणखी साधारण २० वर्षानी  षष्ट्यदेवाने अपल्या सासर्‍याचीच मदत घेऊन शिलाहारांना पराभूत केले. आणि याच सुमारास राष्ट्रकूटांचा पराभव करून कल्याणी चालुक्य कुळातील राजा जयसिंह दुसरा याची सत्ता सप्तकोकणात प्रस्थापित झाली. चालुक्यांचा मांडलिक म्हणून षष्ट्यदेव चंद्रपूर येथून दक्षिण कोकण आणि गोव्याचा कारभार पाहू लागला. भोज राजांचा काळ गोव्याच्या इतिहासात सुवर्णयुग मानला जातो, तसाच कदंब राजवटीचा सुमारे ४०० वर्षांचा हा काळ गोव्याच्या इतिहासात दुसरे सुवर्णयुग म्हणून नोंदला गेला. कदंबांना 'कदंब' हे नाव कसं मिळालं यामागे एक कथा आहे. यांचा एक पूर्वज 'मुकण्णा' हा इ. स. च्या चौथ्या शतकात, सौंदत्ती इथे कदंब वृक्षाच्या तळी बसून तपश्चर्या करत होता, तेव्हा त्याला त्रिलोचन हरिहराचा दृष्टान्त झाला. इथून या घराण्याचे नाव कदंब असे पडले. म्हणूनच कदाचित, कदं

मधुर हलाहल

मना लागले पिसे प्रियाचे गेह तयाचे हे नभमंडल खूण तयाची धुंडित फिरते जनी वनी हे सर्व धरातल । थकली गात्रे, प्राणहि थकले परि मिळेना तो नभश्यामल अश्रु भरले नयनी आणिक मला कळेना जनकोलाहल । प्रेम प्रियाचे विषसम अमृत पिउनि चेतवी उरी वडवानल अडिच अक्षरे वाचुनि भासे अमृताहुनि मधुर हलाहल। ( "अमृताहुनी मधुर हलाहल" ह्या एका ओळीची समस्यापूर्ती करत करता  मीराबाई  सहजच आठवली आणि एक अख्खी कविताच तयार झाली! )

आमचें गोंय -प्रास्ताविक -1

खूप जुनी गोष्ट आहे. त्यावेळी टीव्ही नव्हता, म्हणजे आमच्याकडे नव्हता. करमणुकीचे साधन म्हणजे चित्रपट आणि नाटके! करमणूक घरबसल्या हवी असेल तर, रेडिओ! आमच्याकडे जुना फिलिप्सचा व्हॉल्व्हवाला रेडिओ होता. कॉलेजमधे जाणारा काका आणि थोडी मोठी आत्या त्यावर गाणी वगैरे ऐकत. मी अगदीच लहान, शाळेतही जात नसेन तेव्हा. एके दिवशी एक गाणे कानावर पडले आणि त्यानंतर चित्रपटाचे नाव पण... 'बॉम्बे टू गोवा'! बॉम्बे तर ऐकून माहित होतं, हे गोवा काय आहे? पण ते पटकन दोन शब्दात संपणारे नाव का कोणास ठाऊक, चांगलेच लक्षात राहिले. पण तेवढेच. पुढे बरीच वर्षे हे नाव उगाचच कधीतरी आठवायचे. वर्गात एकदोन मुलं उन्हाळ्याच्या सुट्टीत गोव्याला जाणारी. त्यांच्याकडून कधीतरी उडत उडत गोव्याबद्दल ऐकलेलं. तिथली देवळं, चर्चेस, बीचेस यांची वर्णनं माफक प्रमाणात ऐकली. असंच कधीतरी मंगेशकर लोक मूळचे गोव्याचे असं वाचलं होतं. बरीच वर्षं गोव्याचा संबंध एवढाच. साल १९८१. अर्धवट, कळत्या न कळत्या वयात आलो होतो. अचानक एक तूफान आलं... 'एक दुजे के लिये'. सुप्परडुप्परहिट्ट सिनेमा! भयानक गाजला. आम्हाला आधी तो बघायची परमिशन नव्हती घरून. प

आमचें गोंय प्रास्ताविक -2

गोवा म्हणलं, की सगळ्याना आठवतो तो निळाशार समुद्र, चंदेरी वाळू, मासळीचा स्वाद दुणा... आणि बरोबरची झिंग आणणारी पेयं. सगळेच जण यांचा आस्वाद घेण्यासाठी कधी ना कधी तरी गोव्याला भेट देतातच. पण गेली १८ वर्षं गोव्यात राहून मला एक गोष्ट कळलीय ती म्हणजे, खरा गोवा या सगळ्यात आहेच, पण या सगळ्यापलीकडे एक गंभीर पुराणपुरुष गोवा आहे, जो तुम्हा आम्हाला २ दिवसांच्या बस टूरमध्ये अजिबात दिसत नाही. त्याला भेटण्यासाठी गोव्यातल्या सांदीकोपर्‍यातल्या गावांमधे जायला हवं. जंगलं धुंडाळायला हवीत आणि गांवकार लोकांच्या पुराण्या कथा ऐकायला हव्यात. म्हणून चला तर, मी, पैसा, आणि प्रीतमोहर तुम्हाला या एका वेगळ्याच गोव्याच्या सफरीवर घेऊन जातोय. काही दिवसांपूर्वी प्रीतमोहरने गोव्याच्या पोर्तुगीजकालीन इतिहासाबद्दल एक लेखमालिका लिहायला सुरुवात केली. अत्यंत मनोरंजक भाषेत तिने महाराष्ट्रातील बहुसंख्य लोकांना अपरिचित असलेला गोव्याचा इतिहास सांगायला सुरुवात केली होती. पहिला भाग प्रसिद्ध झाल्यानंतर बिपिनला एक छान कल्पना सुचली. ती म्हणजे गोव्याचा संपूर्ण इतिहास मिपाकरांच्या समोर आणण्याची. त्याच्या सूचनेवरून आम्ही हे शिवधनुष

आमचें गोंय - प्राचीन इतिहास

इमेज
*** कोकणीत गोवा म्हणजे गोंय. ऐतिहासिक काळात गोव्याला अपरान्त, गोमंतक, गोवापुरी, गोपकपट्टण, गोवाराष्ट्र अशी नावे दिलेली आढळतात. तर अरबी व्यापारी या प्रदेशाला 'सिंदाबुर' या नावाने ओळखत असत. यापैकी अपरान्त हे नाव सर्व कोकणाला दिलेले आहे. तर 'गोमंतक' म्हणजे 'गायींनी भरलेला' असा अर्थ आहे. जरासंधाबरोबरच्या लढायांमधून जरा उसंत घ्यावी म्हणून कृष्ण आणि बलराम गोव्यात आले होते, ही कथा प्रचलित आहे. आपल्या मुलांच्या विरहाने दु:खी होऊन देवकीमाता त्यांच्यामागोमाग गोव्यात आली, आणि तिला पान्हा फुटला. तोच दूधसागर धबधबा अशी कथा गोव्यात सांगितली जाते. या आई मुलांची भेट झाली तिथे माशेलला आजही देवकी-कृष्णाचं मंदिर प्रसिद्ध आहे. 'सिंदाबुर' हे नाव 'चंद्रपूर' या कदंबांच्या राजधानीवरून आले असावे. आज ही प्राचीन राजधानी 'चांदोर' किंवा 'चांदर' म्हणून ओळखली जाते. पण या सर्वांपेक्षाही जुने नाव म्हणजे 'गोंय'. भारतात आर्य लोक सगळीकडे पसरण्यापूर्वी प्रोटोऑस्ट्रोलॉईड / द्रविड वंशाचे लोक सर्व भारतभर पसरलेले होते. छोटा नागपूर पठारावरून कोळ, मुंड

आयज जागतिक मराठी दिन

आयज जागतिक मराठी दिन. या दिनाच्या निमित्तान मराठीची एक धाकटी भैण कोकणी भाषेबद्दल किदें तरी बरोयात अशे हांवे चितलें. म्हणून हो लेख. कोकणी म्हणजे गोंयाची भास असो एक समज आसा, पुण ते सामकें खरे न्हय. कोकणी गोयांन उलैतात, महाराष्ट्रान उलैतात, कर्नाटकान उलैतात, तशी केरळातय उलैतात. काय मंडळी, काही कळलं का? बरं आता मराठीत लिहिते. आज जागतिक मराठी दिन. या दिनाच्या निमित्ताने मराठीची एक धाकटी बहीण कोकणी भाषेबद्दल काहीतरी लिहूया असा मी विचार केला. म्हणून हा लेख. कोकणी म्हणजे गोव्याची भाषा असा एक समज आहे, पण तो पूर्ण खरा नाही. कोकणी गोव्यात बोलतात, महाराष्ट्रात बोलतात, कर्नाटकात बोलतात, तशीच केरळमधेही बोलतात. सोपंय ना? भले कोकणी घटनेच्या ८ व्या परिशिष्टात भाषा म्हणून समाविष्ट झाली आहे, पण ती मराठीला इतकी जवळची आहे, की ती स्वतंत्र भाषा आहे की मराठीची बोलीभाषा याबद्दल लोक वर्षानुवर्षे वाद घालत आले आहेत आणि यापुढेही घालत रहातील. मालवणी या दोघींच्या कुठेतरी अधेमधे. अगदी साध्या गोष्टी बघितल्या तर, मराठीतला 'मला' हा शब्द घ्या. तो मालवणीत 'माका' असा येतो, तर कोकणीत 'म्हाकां'. मराठ

ओ कलकत्ता!

गेल्या वर्षी युनियनच्या कॉंफरन्सच्या निमित्ताने कलकत्त्याला गेले होते. बरोबर 2 मैत्रिणी होत्या. वास्को- हावडा एक्सप्रेसने आम्ही कलकत्त्याला पोचलो. महिला वर्गासाठी रहाण्याची उत्तम सोय गुजरात समाजाच्या लॉजमध्ये केली होती. तर कॉन्फरन्स “महाजाति सदन” मध्ये बडा बाजार रस्त्यावर होती. बाजूलाच मेट्रो स्टेशन आहे. सकाळी ते पाहिलं. कॉंफरन्स सुरू झाली. नाश्ता जेवण सगळं वेगळ्याच बंगाली चवीचं पण स्वादिष्ट होतं. दिवसभर भाषणं वगैरे झाली. रात्रीच्या जेवणाची व्यवस्थाही तिथेच, म्हणजे महाजाति सदन मध्ये होती. रसभरे रसगुल्ले खाउन रसना तृप्त झाली. जेवण जरा जास्तच झालं. आम्हाला गुजरात लॉजकडे पोचवण्यासाठी बसेस ठेवल्या होत्या. बस यायला थोडा वेळ होता. म्हटलं थोडे पाय मोकळे करूया. मी आणि माझी मैत्रीण रस्त्याच्या बाजूच्या फूटपाथवर चालायला लागलो. मेट्रो स्टेशन ओलांडून थोडं पुढे गेलो. काही अंतरावर फूटपाथवर बस स्टॉपचा एक आडोसा होता. वरचा लाईट बंद होता. त्या अर्धवट उजेडात नीट पाहिलं तर एक म्हातारा, एक म्हातारी आणि एक मध्यमवयीन पण उतारवयाचा माणूस, तिघंजण जीर्ण मळकट कपडे पांघरून फूटपाथवर कोंडाळं करून बसले होते. नीट प

माझा बसप्रवास

तुमच्यापैकी जे मुंबईकर असतील, ते म्हणतील, “हॅः बसचा प्रवास ही काय लिहिण्यासारखी गोष्ट आहे? एकदा विरार फास्ट लोकलने जाऊन दाखवा. पुणेकर म्हणतील, “आमची पी.एम. टी. लै भारी. बसमधून सगळ्या हाडांसहित नीट चढून किंवा उतरून दाखवा.” पण माझ्या मित्रांनो, तुम्ही कधीच आमच्या गोवेकर खाजगी बसमध्ये बसले नसणार. मुंबैहून बदली होऊन आलेल्या साहेबलोकांनीसुद्धा शरणागती लिहून दिल्ये की “तुमच्या गोव्याच्या बसमधून प्रवास करणे हे येरागबाळ्याचे काम नोहे.” तुम्हाला थोडी पार्श्वभूमी सांगणं आवश्यक आहे नाही का? कारण असं की, तुम्ही गोव्यात येता, २ दिवसांची टूर करता आणि परत जाता. आम्ही नेहमी इथे रहाणारे लोक खाजगी बसवाल्यांच्या तावडीत सापडलेले असतो, कारण सरकारी मालकीच्या कदंबा बस फारच कमी आहेत. त्यात अनेक पुढार्‍यांच्या मालकीच्या बस आहेत, ते येन केन प्रकारेण कदंबाच्या बसेस धड चालूच देत नाहीत! ते असो. हे खाजगी बसवाले म्हणजे परमेश्वरासारखेच असतात, अवर्णनीय! कंडक्टरने गणवेष घातला पाहिजे वगैरे नियम आहेत, पण ते कागदावरच. तिकिट मागितलंत, तर “कोणत्या झूमधून आलंय हे?” अशा नजरेनं बघतील. उर्मटपणे वागता येणे हे कंडक्टर होण्यासाठी

आणखी एक तळीराम

मी लहान असताना आमच्याकडे अपूर्व नावाचं डायजेस्ट (रीडर्स डायजेस्ट सारखं) येत असे. तेव्हा एकदा त्यात “मला दारू चढत नाही” अशी एक अफलातून कविता आली होती. काळाबरोबर ती विस्मृतीत गेली. पण हल्लीच आणखी कसलातरी संदर्भ शोधताना महाराष्ट्र टाईम्सच्या वेबसाईटवर ती दिसली आणि परमानंद जाहला. कविता मुळात खूप जुनी, म्हणजे 1961 ची. तेव्हा माझा जन्मही झाला नव्हता. त्यामुळे कवि श्री. वि रा भाटकर यांच्याबद्दल काही माहिती असण्याची शक्यता नव्हतीच. पण “अपूर्व” मध्ये ही कविता छापताना असा उल्लेख दिला होता की कवि: वि. रा. भाटकर (आधारित चित्रे : दीनानाथ दलाल) ( ' दीपावली '- जानेवारी 1961 मधून साभार) पुढे म.टा च्या पानाचा दुवा देत आहे. ज्यांना पुनःप्रत्ययाचा आनंद घ्यायचा असेल त्यांनी या पृष्ठाला जरूर भेट द्यावी. नंतरच्या पिढीतील वाचकांनी एका मजेदार अनुभवासाठी वाचायला हरकत नाही. (कवितेचा  दुवा ). कवितेत एका “तळीरामाचं” कथन आहे. तो सुरुवातीला म्हणतो की, “मला दारू चढत नाही दारूबंदी असूनही मी दारू खूप पितो पण मला दारू कधी चढत नाही. याचं एक कारण आहे. दारू पिण्याची माझी एक स्पेशल सिस्टीम आहे. “ पुढे तो आपल

मनी

आमची मनी, म्हणजे मनीमावशी. अर्थात वाघाची मावशी. मासे खाणे आणि झोपा काढणे हा तिचा अत्यंत आवडता उद्योग. तिचा जन्मच आमच्या घरात झाला. त्यामुळे घरातील सर्वांची अतिशय लाडकी. आहे तशी गुणी. कधी कोणाला नख लावत नाही. की चावत नाही. तिला पहिल्यांदा पिल्लं झाली तेव्हा तिने मला रात्रभर सोबत बसवून ठेवलं होतं, एवढा माणसांवर विश्वास ठेवते. खूपच मायाळू, म्हणजे मधेच मांडीवर येऊन बसेल आणि रोज सकाळी पोळी भरवून घेईल. खूप लाड करून घेते. तिची पिल्लं लहान असतानाची ही हकीकत. एकदा रात्री एक मोठा बोका चोरपावलांनी घरात घुसला. आम्ही सगळेजण झोपेत होतो. मनीने सरळ त्याच्यावर हल्ला चढवला. आवाज ऐकून आम्ही सगळे जागे झालो. पहातो तर काय, तो बोका खिडकीतून पलायन करण्याच्या प्रयत्नात होता. मनीने त्याचा पाठलाग सुरू केला. खिडकीतून बाहेर, मग रस्त्यावर, मग पाठच्या डोंगरावर. बोका पुढे आणि मनी मागे अशी शर्यत आम्ही पाहिली. बरेच वेळाने मनी परत आली. मी म्हटलं आला गल्लीचा दादा परत. पण तेव्हापासून तो बोका परत आला नाही. आता रात्री मनी पिल्लांपासून थोडी दूर बसून रहाते. कारण एखादा बोका आला तर? पिल्लं थोडी मोठी झाली. मनी हळू हळू पिलांना