पोस्ट्स

मार्च, २०१२ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

नर्मदे हर!!

नर्मदे हर! काही दिवसांपूर्वी एक "मिसळपावकर" आत्मशून्य नर्मदा परिक्रमेच्या उद्देशाने बाहेर पडला. पण काही कारणाने त्याची परिक्रमा पुरी नाही झाली. त्या निमित्ताने सध्या मध्य प्रदेशात रहाणार्‍या यशवंत कुलकर्णीने 'एका मिपाकराची नर्मदा परिक्रमा' ही सुंदर लेखमालिका 'मिसळपाव' संस्थळावर लिहिली होती. ती वाचताना या नर्मदा परिक्रमेबद्दल कुतुहल जागं झालं. की हे काय प्रकरण आहे? अशी कोणती प्रेरणा आहे, की जिच्यामुळे लोक हजारों मैलांचं अंतर पायी चालून जायला तयार होतात? तसं खूप वर्षांपूर्वी गोनीदांचं 'कुण्या एकाची भ्रमणगाथा' वाचलं होतं. पण मध्यंतरीच्या वर्षात ते कुठेतरी मागे राहून गेलं होतं. यशवंतच्या लेखावर प्रतिक्रिया लिहिणार्‍यांनी जगनाथ कुंटे यांच्या 'नर्मदे हर' पुस्तकाचा उल्लेख केला होता. आयुष्यात कधी नर्मदा परिक्रमेला जाऊ न जाऊ, निदान प्रत्यक्ष जाऊन आलेल्याचे अनुभव वाचावेत म्हणून पुस्तकाचा शोध सुरू झाला. रत्नागिरीला गेले होते तेव्हा एका दुकानात चौकशी करता पुस्तक सध्या नाही मागवून देऊ असं सांगितलं. आता पुस्तकांच्या दुकानात जाऊन रिकाम्या हाताने परत कसं य

रांगोळ्या

इमेज
हे काय असावं? पोर्ट्रेट? की फोटो? यातलं काही नाही. ही रांगोळी आहे. माझ्या ऑफिसातला एक कलाकार नरेश आणि त्याचा जुळा भाऊ गणेश माणगावकर यांनी काढलेली. नरेश आणि गणेश हे गोव्यातल्या एका लहानशा साखळी नावाच्या गावातले जुळे भाऊ. लहान असताना दोघांनाही चित्रकला आवडायची. मग दिवाळीतली रांगोळी प्रदर्शनं पाहून हे दोघेही रांगोळ्या काढायला लागले. ८वी/९वीत असताना त्यांनी स्वतंत्रपणे शाळेतल्या रांगोळी प्रदर्शनात रांगोळी काढली. ती लोकांना खूप आवडली. मग अशा मोठ्या रांगोळ्या काढणं हा दरवर्षीचा उद्योग झाला. म्हापसा, वास्को इथल्या प्रदर्शनात ते रांगोळ्या काढायला लागले. काही प्रदर्शनातून बक्षीसे मिळत असत तर काहीत फक्त शाबासक्या. मग हळूहळू दोघेही माणगावकर बंधू नोकरीनिमित्त पणजी इथे राहू लागले. कला अकादमीचे सदस्य झाले. जेव्हा आंतर्राष्ट्रीय फिल्म फिस्टिव्हल्सची सुरुवात झाली तेव्हा याना उद्घाटनाच्या ठिकाणी कला अकादमीत रांगोळी काढायला बोलावलं गेलं. उद्घाटकाची छबी रांगोळीतून चितारायची पद्धत या दोघानी सुरू केली. अनेकदा अशा प्रमु़ख पाहुण्याकडून शाबासकी मिळते, पण नेहमीच सगळं स