पड्यारमाम
कवळे शाखेत बदली झाली, तेव्हा शाखा घराजवळ असल्याने मोठ्या उत्साहाने जॉइनिंग टाईम न घेता शाखेत दुसर्याच दिवशी हजर झाले. शाखेत पाय ठेवला, तेव्हा मॅनेजरची केबिन रिकामी होती. काउंटरवरचे काही चेहरे ओळखीचे होते. एक नवाच अनोळखी चेहरा 'मे आय हेल्प यू' काउंटरवर बसला होता. त्याचे वय बघता हा नवा क्लार्क नव्हे, हे सहजच लक्षात येत होते. चेहर्यावर भरपूर पावडर चिकटून बसलेली, कसला तरी उग्र वासाचा सेंट मारलेला आणि कपाळावर गंध. मात्र चेहर्यावर अगदी खरेखुरे हसू होते. "अरे ज्योती, तू आयले गो?" (अरे, ज्योती, तू आलीस का?) म्हणत मोहिनी भट पुढे आली. तोपर्यंत शरद पेंडसेही माझ्यामागोमाग येऊन पोहोचला. शरद हे एक जबरदस्त व्यक्तिमत्त्व. त्याच्याकडे बघून अगदी बाजीराव पेशवा कसा दिसत असेल याची कल्पना यावी. खूपच हुशार. मात्र घरच्या काही अडचणींमुळे कधीच प्रमोशनच्या वाटेला न गेलेला. तो कधीतरी कवळे शाखेत येऊन गेला असावा. कारण त्याने येताच काउंटरवरच्या माणासाला हात दिला. "पड्यारमाम, कसो आसा तू?" (पड्यारमाम, तू कसा आहेस?) "हे ज्योती कामत. हाजीय मज्याबरोबर हांगा ट्रान्स्फर जा...