पोस्ट्स

रणबीर राज कपूर

इमेज
रणबीर राज कपूर # शतलेख , # राजकपूर (*माझा मराठीचा बोल या फेसबुक ग्रुपवर पूर्वप्रकाशित)  ----------------------------------- दूरदर्शन पाहणे हल्ली एकूण कमीच झाले आहे. पण रविवारी सकाळी 8 वाजता रंगोली निदान काम करता करता ऐकायची हा कित्येक वर्षांचा शिरस्ता. गेल्या रविवारी सकाळी रंगोली चालू केली. आणि सगळी कामं सोडून टीव्ही बघत बसले. कारण होतं समोरच्या पडद्यावर असलेली निळ्या डोळ्यांची एक जादू. त्याचं नाव रणबीर राज कपूर. हे राज कपूरच्या अभिनयाचं किंवा दिग्दर्शनाचं समीक्षण नव्हे. पण काहीसं विस्कळीत वर्णन म्हणता येईल. वास्तविक मी लहान असताना राज कपूरची सद्दी संपून ऋषीचा चढता काळ होता. खरे तर राजेश खन्नाही उतरणीला लागून अमिताभ नावाचा सूर्य तळपू लागला होता. पण तेव्हा सिनेमा पाहणे हीआतासारखी सोपी गोष्ट नव्हती. शोले रत्नागिरीत यायला प्रदर्शित हौन दोन वर्षे जावी लागली होती. त्यामुळे जुने सिनेमाही अधून मधून लागत असत. अशात कधीतरी अनाडी लागला. रत्नागिरीचे दिव्य लता टॉकिज. तिथे बाल्कनीचं तिकीट एक रुपयात मिळायचं. कोणाच्या तरी डोक्यात पंखा पडल्याची सुरस आणि चमत्कारिक कथा ऐकू यायची. तर

पड्यारमाम

कवळे शाखेत बदली झाली, तेव्हा शाखा घराजवळ असल्याने मोठ्या उत्साहाने जॉइनिंग टाईम न घेता शाखेत दुसर्‍याच दिवशी हजर झाले. शाखेत पाय ठेवला, तेव्हा मॅनेजरची केबिन रिकामी होती. काउंटरवरचे काही चेहरे ओळखीचे होते. एक नवाच अनोळखी चेहरा 'मे आय हेल्प यू' काउंटरवर बसला होता. त्याचे वय बघता हा नवा क्लार्क नव्हे, हे सहजच लक्षात येत होते. चेहर्‍यावर भरपूर पावडर चिकटून बसलेली, कसला तरी उग्र वासाचा सेंट मारलेला आणि कपाळावर गंध. मात्र चेहर्‍यावर अगदी खरेखुरे हसू होते. "अरे ज्योती, तू आयले गो?" (अरे, ज्योती, तू आलीस का?) म्हणत मोहिनी भट पुढे आली. तोपर्यंत शरद पेंडसेही माझ्यामागोमाग येऊन पोहोचला. शरद हे एक जबरदस्त व्यक्तिमत्त्व. त्याच्याकडे बघून अगदी बाजीराव पेशवा कसा दिसत असेल याची कल्पना यावी. खूपच हुशार. मात्र घरच्या काही अडचणींमुळे कधीच प्रमोशनच्या वाटेला न गेलेला. तो कधीतरी कवळे शाखेत येऊन गेला असावा. कारण त्याने येताच काउंटरवरच्या माणासाला हात दिला. "पड्यारमाम, कसो आसा तू?" (पड्यारमाम, तू कसा आहेस?) "हे ज्योती कामत. हाजीय मज्याबरोबर हांगा ट्रान्स्फर जा

बाप्पाचा नैवेद्य: खजूर शेंगदाणा लाडू

इमेज
गणपतीबाप्पाचा नैवेद्य म्हणजे विविध प्रकारचे लाडू आलेच. गणेश चतुर्थीला उपास करणारी मंडळी भरपूर आहेत. त्या सर्वांना चालेल असे लाडू म्हणजे खजुराचे लाडू. मी खजूर आणि शेंगदाण्याच्या कुटाचे लाडू केले. मात्र शेंगदाण्याऐवजी तुम्ही सुका मेवा, बदाम, काजूगर या गोष्टी वापरूनही असेच लाडू तयार करू शकता. हे लाडू अतिशय पौष्टिक आहेत तसेच पांढरी साखर न वापरता खजूर वापरल्याने शरीराला काही प्रमाणात लोह मिळते. हे लाडू इतरही उपासाला चालतात. पाहूया तर कृती साहित्यः अर्धी वाटी भाजलेल्या शेंगदाण्याचे जाडसर कूट १२ ते १५ बिया काढलेले खजूर थोडेसे तूप कृती: शेंगदाणे भाजून त्याचे जाडसर कूट करून घ्यावे. खजूर मऊ असेल तर बिया काढून हाताने कुस्करावा. फार मऊ नसेल तर तुकडे करून मिक्सरमधून भरड वाटून घ्यावे आणि कढईत किंचित परतून घ्यावे. आवश्यकतेप्रमाणे तूप घालून (अर्धा एक चमचा पुरते, किंवा अजिबात घातले नाही तरी चालते.) सगळे नीट एकत्र करून छोटे लाडू वळावेत. या प्रमाणात ७/८ लाडू होतात. करा तर सुरुवात! गणपतीबाप्पा मोरया!

होरपळ

इमेज
"आई, मनीकडे जाते गं खेळायला." "ये जाऊन. जेवायच्या वेळेपर्यंत ये, म्हणजे झालं." "हो, येते गं" म्हणत आमची स्वारी निघाली रस्त्याकडे. वाटेत रहाटाच्या पाळीवरून विहिरीत डोकावलं नाही, तर पाप लागलं असतं. जरा टाचा उंचावतेय, तोच शेजारचे काका पंप सुरू करायला आले. "काय बघतेस गं?" मी फक्त मान उंचावून डोळे विस्फारून हसले. बेड्यातून बाहेर. रस्त्यावर. गोंद्या बैलगाडी घेऊन तरीकडे निघालेला. त्याला वाट दिली. हो, बैलांनी मला शिंग मारलं तर काय घ्या! काही मुलं सायकलचे टायर काठीने पळवत होती. त्यांच्याकडे एक तुच्छ कटाक्ष टाकून मी वेगाने मनीच्या घराकडे निघाले. वाटेत बैलगाडीच्या चाकोर्‍यांनी रस्त्यात दोन्ही बाजूला घळी आणि मध्ये उंचवटा तयार झालेला. धुळीत टायरचे ठसे आणि मण्यार गेल्याच्या पुसट खुणा. काळजीपूर्वक त्या उंचवट्यावरून चालत राहिले. एवढ्यात मनीच्या परसवाचं बेडं आलंच. बेड्यातून आत चार दळे पार करून धावत गेले, तर मनीच्या घरच्या मागच्या सोप्यात काहीतरी गडबड दिसली. बरीच माणसं जमली होती. मोठ्या माणसांच्या पायातून वाकून पाहिलं, तर माई - म्हणजे मनीची मो

प्रवासातले काही अनुभवः फतेहपूर सीकरी, दिल्ली आणि म्हैसूर बंगलोर

फतेहपूर सीकरी मुलं लहान असताना त्यांना घेऊन जमेल तसे फिरत होतो. २००५ मधे दिवाळीच्या आधी सुटी घेऊन दिल्ली वारी करू म्हटले. दिल्लीला जायचे म्हटल्यावर ८० वर्षांचे सासरे बरोबर येतो म्हणाले. त्यांची दोघांचीही तिकिटे काढली. हॉटेल्स दिल्लीत जाऊन बघू म्हटले. दोन म्हातारे आणि दोन मुले बरोबर असल्याने फार काही बघून होणार नाही हे माहीत होतेच. त्याप्रमाणे दिल्ली, आग्रा, मथुरा, फतेहपूर सीकरी एवढाच प्लॅन ५ दिवसांसाठी ठरवला. जुनी दिल्ली, लाल किल्ला, म्युझियम वगैरे पाहिले. मथुरा वृंदावन, आग्रा किल्ला, ताजमहाल हे बघून झाले. हॉटेलवाल्याने गाडी ठरवून दिली होती तो ड्रायव्हर मुस्लिम होता. अतिशय अदबशीर ऊर्दू-हिंदी बोलणारा आणि व्यवस्थित माणूस. पान सिगारेट काही व्यसन दिसले नाही. ग्रँड ट्रंक रोडवर दरोडे वगैरे घातले जातात असे काहीबाही सांगत होता. फतेहपूर सीकरीला जाताना किल्ल्याजवळ पोचताच ५/६ टपोरी पोरांनी गाडीच्या मागून पुढून धावत गाडीला अक्षरशः घेरले. दोघेजण गाडीच्या बॉनेटवर चढले. शेवट ड्रायव्हरने गाडी थांबवली. पोरे एकूण 'अवतार' दिसत होती. ऊर्मट भाषेत आम्ही गाईड आहोत, किल्ला दाखवू म्हणाले. ड्रायव्ह

किल्ला चित्रपटाच्या निमित्ताने..

इमेज
रविवारी "किल्ला" (२०१५) पाहिला. अतिशय सुंदर अनुभव देणारा चित्रपट. १०/११ वर्षांचा चिनू आणि त्याची आई चिनूचे वडील नुकतेच गेल्यावर आयुष्याशी तडजोड करत आहे ती परिस्थिती स्वीकारायला शिकतात, त्यांच्या आयुष्यातल्या साधारण एका वर्षातल्या घडामोडीं या चित्रपटात आपल्याला बघायला मिळतात.  चित्रपट प्रदर्शित होऊन आता बरेच दिवस झालेत त्यामुळे कथेचा काही भाग इथे त्यानिमित्ताने मनात आलेले विचार लिहिताना आला तर तो स्पॉयलर ठरू नये. चित्रपटात फोनचा वापर, मुलांचे सुटीतले उद्योग आणि एका प्रसंगात ऑडिओ कॅसेट्सच्या टेपचा गुंतवळ सोडवणे हा प्रकार पाहता चित्रपट कथा १९९४-९५ च्या दरम्यान घडत असावी असे वाटते. चिनूच्या वडिलांचे नुकतेच निधन झाले आहे आणि त्याच्या आईची बदली पुण्याहून गुहागरसारख्या एका लहान गावात झाली आहे. तिला ऑफिसात तिच्या स्वतःच्या अडचणी आहेत. चिनूला नवीन जागेत कोणी मित्र नाहीत. मामा आणि मामेभाऊ यांच्या ओळखीच्या सुरक्षित जगातून तो एकदम नव्या जागेत वेगळ्या वातावरणात येऊन पडला आहे. आपल्या मुळापासून उखडले जाणे आणि एकाकीपणा याचा त्याला आयुष्यात प्रथमच सामना करावा लागल्याने तो भांबावतो आणि

Earth’s Children

नमस्कार मंडळी! आज आपण Jean Marie Auel यांनी लिहिलेल्या Earth’s Children या कादंबरी मालिकेची ओळख करून घेऊया. १९८० साली या मालिकेतील पहिले पुस्तक प्रसिद्ध झाले, The Clan of the Cave Bear. यानंतर २०११ पर्यंत या मालिकेत एकूण ६ भाग क्रमाक्रमाने प्रकाशित झाले. The Clan of the Cave Bear, The Valley of Horses, The Mammoth Hunters, The Plains of Passage, The Shelters of Stone, The Land of Painted Caves एकूण सुमारे ४५०० छापील पाने मजकूर ६ खंडात विभागून लिहिण्याची प्रचंड कामगिरी श्रीमती ऑएल यांनी केली. २०१० पर्यंतच या पुस्तकांच्या एकूण साडेचार कोटी प्रती विकल्या गेल्या होत्या. बरीच वाट पाहून प्रकाशित झालेले शेवटचे पुस्तक आल्यानंतरचे आकडे मला माहित नाहीत. पुस्तकाची ओळख करून घेण्यापूर्वी लेखिकेची ओळख करून घेऊ. जीन मारी ऑएल यांचा जन्म १८ फेब्रुवारी १९३६ ला झाला. त्यांचे मूळ फिनलंडमधले, पण यु.एस्.ए. मधे स्थायिक. त्या एम्.बी.ए. झालेल्या आहेत. आणि ५६ वर्षांचे प्रदीर्घ सुखी वैवाहिक जीवन जगताना त्यांनी ५ मुलांना वाढवले आहे. Earth’s Children मालिकेतील कादंबर्याूत वर्णन केलेले कुटुंब केंद्रित वात