Earth’s Children
नमस्कार मंडळी! आज आपण Jean Marie Auel यांनी लिहिलेल्या Earth’s Children या कादंबरी मालिकेची ओळख करून घेऊया. १९८० साली या मालिकेतील पहिले पुस्तक प्रसिद्ध झाले, The Clan of the Cave Bear. यानंतर २०११ पर्यंत या मालिकेत एकूण ६ भाग क्रमाक्रमाने प्रकाशित झाले. The Clan of the Cave Bear, The Valley of Horses, The Mammoth Hunters, The Plains of Passage, The Shelters of Stone, The Land of Painted Caves एकूण सुमारे ४५०० छापील पाने मजकूर ६ खंडात विभागून लिहिण्याची प्रचंड कामगिरी श्रीमती ऑएल यांनी केली. २०१० पर्यंतच या पुस्तकांच्या एकूण साडेचार कोटी प्रती विकल्या गेल्या होत्या. बरीच वाट पाहून प्रकाशित झालेले शेवटचे पुस्तक आल्यानंतरचे आकडे मला माहित नाहीत. पुस्तकाची ओळख करून घेण्यापूर्वी लेखिकेची ओळख करून घेऊ. जीन मारी ऑएल यांचा जन्म १८ फेब्रुवारी १९३६ ला झाला. त्यांचे मूळ फिनलंडमधले, पण यु.एस्.ए. मधे स्थायिक. त्या एम्.बी.ए. झालेल्या आहेत. आणि ५६ वर्षांचे प्रदीर्घ सुखी वैवाहिक जीवन जगताना त्यांनी ५ मुलांना वाढवले आहे. Earth’s Children मालिकेतील कादंबर्याूत वर्णन केलेले कुटुंब केंद्रित वात...