पोस्ट्स

प्रवासातले काही अनुभवः फतेहपूर सीकरी, दिल्ली आणि म्हैसूर बंगलोर

फतेहपूर सीकरी मुलं लहान असताना त्यांना घेऊन जमेल तसे फिरत होतो. २००५ मधे दिवाळीच्या आधी सुटी घेऊन दिल्ली वारी करू म्हटले. दिल्लीला जायचे म्हटल्यावर ८० वर्षांचे सासरे बरोबर येतो म्हणाले. त्यांची दोघांचीही तिकिटे काढली. हॉटेल्स दिल्लीत जाऊन बघू म्हटले. दोन म्हातारे आणि दोन मुले बरोबर असल्याने फार काही बघून होणार नाही हे माहीत होतेच. त्याप्रमाणे दिल्ली, आग्रा, मथुरा, फतेहपूर सीकरी एवढाच प्लॅन ५ दिवसांसाठी ठरवला. जुनी दिल्ली, लाल किल्ला, म्युझियम वगैरे पाहिले. मथुरा वृंदावन, आग्रा किल्ला, ताजमहाल हे बघून झाले. हॉटेलवाल्याने गाडी ठरवून दिली होती तो ड्रायव्हर मुस्लिम होता. अतिशय अदबशीर ऊर्दू-हिंदी बोलणारा आणि व्यवस्थित माणूस. पान सिगारेट काही व्यसन दिसले नाही. ग्रँड ट्रंक रोडवर दरोडे वगैरे घातले जातात असे काहीबाही सांगत होता. फतेहपूर सीकरीला जाताना किल्ल्याजवळ पोचताच ५/६ टपोरी पोरांनी गाडीच्या मागून पुढून धावत गाडीला अक्षरशः घेरले. दोघेजण गाडीच्या बॉनेटवर चढले. शेवट ड्रायव्हरने गाडी थांबवली. पोरे एकूण 'अवतार' दिसत होती. ऊर्मट भाषेत आम्ही गाईड आहोत, किल्ला दाखवू म्हणाले. ड्रायव्ह...

किल्ला चित्रपटाच्या निमित्ताने..

इमेज
रविवारी "किल्ला" (२०१५) पाहिला. अतिशय सुंदर अनुभव देणारा चित्रपट. १०/११ वर्षांचा चिनू आणि त्याची आई चिनूचे वडील नुकतेच गेल्यावर आयुष्याशी तडजोड करत आहे ती परिस्थिती स्वीकारायला शिकतात, त्यांच्या आयुष्यातल्या साधारण एका वर्षातल्या घडामोडीं या चित्रपटात आपल्याला बघायला मिळतात.  चित्रपट प्रदर्शित होऊन आता बरेच दिवस झालेत त्यामुळे कथेचा काही भाग इथे त्यानिमित्ताने मनात आलेले विचार लिहिताना आला तर तो स्पॉयलर ठरू नये. चित्रपटात फोनचा वापर, मुलांचे सुटीतले उद्योग आणि एका प्रसंगात ऑडिओ कॅसेट्सच्या टेपचा गुंतवळ सोडवणे हा प्रकार पाहता चित्रपट कथा १९९४-९५ च्या दरम्यान घडत असावी असे वाटते. चिनूच्या वडिलांचे नुकतेच निधन झाले आहे आणि त्याच्या आईची बदली पुण्याहून गुहागरसारख्या एका लहान गावात झाली आहे. तिला ऑफिसात तिच्या स्वतःच्या अडचणी आहेत. चिनूला नवीन जागेत कोणी मित्र नाहीत. मामा आणि मामेभाऊ यांच्या ओळखीच्या सुरक्षित जगातून तो एकदम नव्या जागेत वेगळ्या वातावरणात येऊन पडला आहे. आपल्या मुळापासून उखडले जाणे आणि एकाकीपणा याचा त्याला आयुष्यात प्रथमच सामना करावा लागल्याने तो भांबावतो आणि ...

Earth’s Children

नमस्कार मंडळी! आज आपण Jean Marie Auel यांनी लिहिलेल्या Earth’s Children या कादंबरी मालिकेची ओळख करून घेऊया. १९८० साली या मालिकेतील पहिले पुस्तक प्रसिद्ध झाले, The Clan of the Cave Bear. यानंतर २०११ पर्यंत या मालिकेत एकूण ६ भाग क्रमाक्रमाने प्रकाशित झाले. The Clan of the Cave Bear, The Valley of Horses, The Mammoth Hunters, The Plains of Passage, The Shelters of Stone, The Land of Painted Caves एकूण सुमारे ४५०० छापील पाने मजकूर ६ खंडात विभागून लिहिण्याची प्रचंड कामगिरी श्रीमती ऑएल यांनी केली. २०१० पर्यंतच या पुस्तकांच्या एकूण साडेचार कोटी प्रती विकल्या गेल्या होत्या. बरीच वाट पाहून प्रकाशित झालेले शेवटचे पुस्तक आल्यानंतरचे आकडे मला माहित नाहीत. पुस्तकाची ओळख करून घेण्यापूर्वी लेखिकेची ओळख करून घेऊ. जीन मारी ऑएल यांचा जन्म १८ फेब्रुवारी १९३६ ला झाला. त्यांचे मूळ फिनलंडमधले, पण यु.एस्.ए. मधे स्थायिक. त्या एम्.बी.ए. झालेल्या आहेत. आणि ५६ वर्षांचे प्रदीर्घ सुखी वैवाहिक जीवन जगताना त्यांनी ५ मुलांना वाढवले आहे. Earth’s Children मालिकेतील कादंबर्याूत वर्णन केलेले कुटुंब केंद्रित वात...

कातरवेळी

कातरवेळी किनार्‍यावर फिकट वाळू अन स्तब्ध माड उभे स्तब्ध गढूळ सागर अन आभाळही भरलेले पाखरे घरट्यात परतलेली आणि थांबलेला वारा अवघे अस्तित्व जणू वाट पहाणारे अधीर, अपेक्षेत कसल्या अन अचानक अवघे चैतन्य सळसळून येते झावळ्यांतून कुंद आभाळातून मेघांना दूर सारीत येते एक लवलवती वीज वार्‍याला सापडतो त्याचा वेग आणि थेंब येतात नाचत वार्‍याचे बोट धरून तापलेली वाळू थंडावते मायेने स्वागत करते त्या पहिल्या वहिल्या थेंबांचे

प्रवास

बरेच दिवसांनी नवर्‍याबरोबर रेल्वेने एका छोट्या प्रवासाला निघाले होते . आदल्या दिवशीच पुण्याहून बसने परत आले होते आणि तत्कालमधे रिझर्व्हेशन करायलाही जमलं नव्हतं . तीन साडेतीन तासांचा प्रवास आहे , जाऊ जनरलमधे बसून म्हटलं आणि निघालो . स्टेशनवर पोचलो तर गाडी अर्धा तास लेट असल्याचं शुभवर्तमान कळलं . मग तिकीट काढून जनरलचा डबा समोर येईल अशा बेताने प्लॆटफॉर्मवरच पेपर टाकून मस्त बैठक मारली . रूळ क्रॉस करणार्‍या बर्‍याच मंडळीचं निरीक्षण करून झालं . एक पाणचट चहा पिऊन झाला . शेवट अर्धा तास उशीरा येणारी गाडी एक तास उशीरा येऊन प्लॆटफॉर्मला लागली . जनरलच्या डब्यात आधीपासूनच उभे असलेले लोक पाहिले आणि हे आपलं काम नव्हे याची खूणगाठ बांधत स्लीपरच्या डब्याकडे धाव घेतली . 4/5  डबे मागे चालत गेल्यावर एका डब्यात एक अख्खं बाक रिकामं दिसलं . टीसी येईपर्यंत बसून घेऊ म्हटलं , आणि काही मिनिटांतच टीसीसाहेब अवतीर्ण झाले . आमच्याकडे जनरलचं तिकीट आहे आणि फरकाचे पैसे भरून बर्थचं तिकीट दिलंत तर उपकार होतील असं सांगताच त्यांनी इतर काही बिनापावतीचे इ . सूचक वगैरे न बोलता पावती फाडून हातात ठेवली आणि बर्थ क्रमांक ...

ऐका गणेशदेवा तुमची कहाणी

ऐका गणेशदेवा तुमची कहाणी. निर्मळ मळे, उदकाचे तळे, बेलाचा वृक्ष, सुवर्णाची कमळे. विनायकाची देवळे, रावळे. मनचा गणेश मनी वसावा. हा वसा कधी घ्यावा? श्रावण्या चौथी घ्यावा, माही चौथी संपूर्ण करावा. संपूर्णाला काय करावे? पशा पायलीचे पीठ कांडावे. अठरा लाडू करावेत. सहा देवाला, सहा ब्राम्हणाला, सहाचं सहकुटूंब भोजन करावे. अल्प दान, महा पुण्य असा गणराज मनी ध्याइजे, मनी पाविजे, चिंतीले लाभिजे. ही पांचा उत्तरांची कहाणी पांचा उत्तरी सुफळ संपूर्ण. ********** श्रावणात प्रत्येक वारी त्या त्या वाराची कहाणी आजी वाचायची. त्या कहाणीच्या आधी ही गणेशाची कहाणी नेहमी वाचायची. आजीला तर ही कहाणी पाठच होती. कोणत्याही कामाची सुरुवात म्हणजे श्रीगणेशा करायचा तर गणपतीचे नाव घेणे परंपरेत आवश्यक समजले जाते ना, म्हणूनच ही लहानशी गणेशाची कहाणी. अगदी साधी सोपी. मोजक्या शब्दात गणपतीच्या राऊळाचे वर्णन आहे. निर्मळ मळे उदकाचे तळे. बेलाचा वृक्ष आहे. म्हणजे शिवाचे देऊळ कुठेतरी जवळपास असणार. तळ्यात सुवर्णकमळे आहेत. आणि तळ्याशेजारी विनायकाचे देऊळ आहे. गणपतीचे विनायक हे नाव पुराणांमधे आणि बौद्ध तंत्रात वापरले गेले आहे. कहाणी...

विंचुर्णीचे धडे - गौरी देशपांडे

विंचुर्णीचे धडे गौरी देशपांडेचं "एकेक पान गळावया" या बहुचर्चित पुस्तकांएवढं कदाचित प्रसिद्ध नसेल पण या पुस्तकावरही गौरीचा मोहक ठसा जाणवतोच. १९९६ चं हे पुस्तक. पुस्तक रूढ अर्थाने कोणत्र्या प्रकारात बसते माहित नाही. ही विंचुर्णीची चित्रे आहेत गौरीने रेखाटलेली. त्या चित्रांची प्रेक्षक म्हणून गौरी थोडीशी दिसते. त्याबरोबर पार्श्वभूमीला तिची मुले, नवरा हेही अधे मधे दिसतात. तशी ही आत्मकथा नव्हे पण एका महत्त्वाच्या टप्प्यावर अनुभवलेलं आयुष्य इथे गौरीने रेखाटलं आहे. या पुस्तकाची प्रस्तावना, अर्पणपत्रिका तेवढीच वाचनीय आहे. आपल्याला विंचुर्णीसारख्या खेड्यात जाऊन रहायची बुद्धी का झाली याचं सुरेख वर्णन यात आहे. याला कारण झालं गौरीच्या स्वप्नातलं कम्युन! प्रत्यक्षात त्या कम्युनमधे बरं वाईट सगळंच असणार आहे विंचुर्णीसारखं. स्वप्न बघायला हवीतच पण प्रत्यक्षात आणखीही खूप काही त्याबरोबर मिळतं. पाहिजे असलेलं आणि नको असलेलंही! पुणे मुंबईच्या गजबजाटातून बाहेर पडून दुष्काळग्रस्त विंचुर्णीला घर बांधायला कारण झाले ते गौरीचे मेव्हणे आणि बहीण. ते आधी तिथे जाऊन राहिले होते ते पाझर तलाव आणि त्यांच्या...