पोस्ट्स

September, 2012 पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

गोव्याची चवथ

इमेज
श्रावणातला पाऊस झिरमिर सुरू झाला की महाराष्ट्रातल्यासारखेच गोव्यातल्या लोकांना पण गणपतीचे वेध लागतात. इथल्या बोलीभाषेत चतुर्थी म्हणजे चवथ. गणपतीच्या सणालाच "चवथ" म्हणायची गोव्यात पद्धत आहे. गोव्यात दिवाळीचं प्रस्थ तसं कमी. म्हणजे फटाके फराळ वगैरे दिवाळीत नसतं, तर सगळं गणपतीत असतं. आम्ही गोव्यात नवीन आलो तेव्हा तर फटाके नसल्यामुळे दिवाळी सुरू आहे असं कळायचं पण नाही. दुकानात फटाके विचारले तर "फुगोटे आता खंय? चवथीकडेन मेळतले" असं ऐकायला मिळालं. तेव्हा कळलं की गोव्यात गणपती हा सगळ्यात मोठा सण. गणेश चतुर्थी आणि पंचमी दोन दिवस गोव्यात सगळ्यांना सुटी. एक दिवस गणरायाच्या आगमनाचा आणि दुसरा विसर्जनाचा. गणपतीत अगदी सगळी ऑफिसे पण दोन दिवस बंद असतात.
गोव्यात शिगमो म्हणजे होळी आणि गणपती हे लोकांचे खास आवडीचे सण. पैकी शिगमो म्हणजे होळी हा सामाजिक तर गणपती वैयक्तिक म्हणावा असा. गोव्यात सार्वजनिक गणपती अजून तसे कमी आहेत. गेल्या २५/३० वर्षातच हे प्रस्थ सुरू झालंय. महाराष्ट्रातल्या सारखे गल्लोगल्लीचे राजे अजून इथे पहायला मिळत नाहीत. आणि एकूणच काहीसं धार्मिक वातावरण असतं. सार्वजनिक ग…