पोस्ट्स

2017 पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

पड्यारमाम

कवळे शाखेत बदली झाली, तेव्हा शाखा घराजवळ असल्याने मोठ्या उत्साहाने जॉइनिंग टाईम न घेता शाखेत दुसर्‍याच दिवशी हजर झाले. शाखेत पाय ठेवला, तेव्हा मॅनेजरची केबिन रिकामी होती. काउंटरवरचे काही चेहरे ओळखीचे होते. एक नवाच अनोळखी चेहरा 'मे आय हेल्प यू' काउंटरवर बसला होता. त्याचे वय बघता हा नवा क्लार्क नव्हे, हे सहजच लक्षात येत होते. चेहर्‍यावर भरपूर पावडर चिकटून बसलेली, कसला तरी उग्र वासाचा सेंट मारलेला आणि कपाळावर गंध. मात्र चेहर्‍यावर अगदी खरेखुरे हसू होते. "अरे ज्योती, तू आयले गो?" (अरे, ज्योती, तू आलीस का?) म्हणत मोहिनी भट पुढे आली. तोपर्यंत शरद पेंडसेही माझ्यामागोमाग येऊन पोहोचला. शरद हे एक जबरदस्त व्यक्तिमत्त्व. त्याच्याकडे बघून अगदी बाजीराव पेशवा कसा दिसत असेल याची कल्पना यावी. खूपच हुशार. मात्र घरच्या काही अडचणींमुळे कधीच प्रमोशनच्या वाटेला न गेलेला. तो कधीतरी कवळे शाखेत येऊन गेला असावा. कारण त्याने येताच काउंटरवरच्या माणासाला हात दिला. "पड्यारमाम, कसो आसा तू?" (पड्यारमाम, तू कसा आहेस?) "हे ज्योती कामत. हाजीय मज्याबरोबर हांगा ट्रान्स्फर जा

बाप्पाचा नैवेद्य: खजूर शेंगदाणा लाडू

इमेज
गणपतीबाप्पाचा नैवेद्य म्हणजे विविध प्रकारचे लाडू आलेच. गणेश चतुर्थीला उपास करणारी मंडळी भरपूर आहेत. त्या सर्वांना चालेल असे लाडू म्हणजे खजुराचे लाडू. मी खजूर आणि शेंगदाण्याच्या कुटाचे लाडू केले. मात्र शेंगदाण्याऐवजी तुम्ही सुका मेवा, बदाम, काजूगर या गोष्टी वापरूनही असेच लाडू तयार करू शकता. हे लाडू अतिशय पौष्टिक आहेत तसेच पांढरी साखर न वापरता खजूर वापरल्याने शरीराला काही प्रमाणात लोह मिळते. हे लाडू इतरही उपासाला चालतात. पाहूया तर कृती साहित्यः अर्धी वाटी भाजलेल्या शेंगदाण्याचे जाडसर कूट १२ ते १५ बिया काढलेले खजूर थोडेसे तूप कृती: शेंगदाणे भाजून त्याचे जाडसर कूट करून घ्यावे. खजूर मऊ असेल तर बिया काढून हाताने कुस्करावा. फार मऊ नसेल तर तुकडे करून मिक्सरमधून भरड वाटून घ्यावे आणि कढईत किंचित परतून घ्यावे. आवश्यकतेप्रमाणे तूप घालून (अर्धा एक चमचा पुरते, किंवा अजिबात घातले नाही तरी चालते.) सगळे नीट एकत्र करून छोटे लाडू वळावेत. या प्रमाणात ७/८ लाडू होतात. करा तर सुरुवात! गणपतीबाप्पा मोरया!

होरपळ

इमेज
"आई, मनीकडे जाते गं खेळायला." "ये जाऊन. जेवायच्या वेळेपर्यंत ये, म्हणजे झालं." "हो, येते गं" म्हणत आमची स्वारी निघाली रस्त्याकडे. वाटेत रहाटाच्या पाळीवरून विहिरीत डोकावलं नाही, तर पाप लागलं असतं. जरा टाचा उंचावतेय, तोच शेजारचे काका पंप सुरू करायला आले. "काय बघतेस गं?" मी फक्त मान उंचावून डोळे विस्फारून हसले. बेड्यातून बाहेर. रस्त्यावर. गोंद्या बैलगाडी घेऊन तरीकडे निघालेला. त्याला वाट दिली. हो, बैलांनी मला शिंग मारलं तर काय घ्या! काही मुलं सायकलचे टायर काठीने पळवत होती. त्यांच्याकडे एक तुच्छ कटाक्ष टाकून मी वेगाने मनीच्या घराकडे निघाले. वाटेत बैलगाडीच्या चाकोर्‍यांनी रस्त्यात दोन्ही बाजूला घळी आणि मध्ये उंचवटा तयार झालेला. धुळीत टायरचे ठसे आणि मण्यार गेल्याच्या पुसट खुणा. काळजीपूर्वक त्या उंचवट्यावरून चालत राहिले. एवढ्यात मनीच्या परसवाचं बेडं आलंच. बेड्यातून आत चार दळे पार करून धावत गेले, तर मनीच्या घरच्या मागच्या सोप्यात काहीतरी गडबड दिसली. बरीच माणसं जमली होती. मोठ्या माणसांच्या पायातून वाकून पाहिलं, तर माई - म्हणजे मनीची मो