पोस्ट्स

एप्रिल, २०१३ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

उकडगरे

इमेज
सध्या माझी आई माझ्याकडे आली आहे. ती आली की मी नेहमी पारंपरिक पाककृत्या तिला विचारून करत असते. त्या फेसबुकवरच्या मित्रमंडळींना बघाव्या लागतात आणि इच्छा असो नसो, चान चान म्हणावे लागते. एका कन्नड लोकांच्या ग्रुपमधे मराठी पाकृ अजिबात माहित नसल्याने त्या खूपच आवडतात असे तिथले लोक म्हणतात. ते कदाचित त्यांच्या जन्मजात सौजन्यशील स्वभावामुळे असावे. मा. स्पाजींबरोबर "कलेसाठी कला की जीवनासाठी कला" या विषयावर आमचा नेहमी फेसबुकीय वाद सुरू असतो. त्यांचे म्हणणे की पाकृचे प्रेझेंटेशन जास्त महत्त्वाचे तर मला वाटते की ती खाणे हे जास्त महत्त्वाचे. या वादाचा निकाल आजपर्यंत लागला नाही. पण त्याचा बदला घेण्यासाठी एकदा मौ भात करून मा. स्पाजींचे नाव त्यावर "टाचायचा" माझा कृतनिश्चय आहे. आजपर्यंत जेव्हा कधी मौ भात केला तेव्हा तो जास्त जीवनावश्यक वाटल्याने त्याचे छायाचित्राच्या कलाकृतीत रूपांतर न झाल्यामुळे तो प्रसंग टळला आहे. ते असो. या जाहीर वादात मा. बिका पुणेकर यांनीही एकदा "प्रेझेंटेशनचं र्‍हाऊ द्या" असे माझ्या काळजाला घरे पाडणारे उद्गार काढल्याने माझे पाकृचे प्रयोग आजपर्यंत