पोस्ट्स

February, 2013 पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

आमचें गोंय- समारोप - आजचा गोवा

आजचा गोवा ६ डिसेंबर १९९२ ला आम्ही आमचं सामान घेऊन गोव्यात आलो. तो दिवस माझ्या चांगलाच लक्षात राहिलाय, कारण त्याच दिवशी अयोध्येत रामजन्मभूमीचा वाद विकोपाला जाऊन मोठाच गोंधळ झाला होता. वाटेत जागजागी पोलीस बंदोबस्त होताच. पण टीव्ही नसल्यामुळे नेमकं काय चाललंय काही कळायला मार्ग नव्हता. पण गोव्यात आल्यावर फार काही टेन्शन वगैरे जाणवलं नाही. त्यापूर्वी आमची बदली होणार हे निश्चित झाल्यावर अधिकार्‍यांनी २ पर्याय दिले होते, एक तर मुंबई किंवा गोवा. मुंबईचं आयुष्य आणि गर्दी, लोकलचा प्रवास हे सगळं आपल्याला न झेपणारं, म्हणून आम्ही गोव्यात यायचा निर्णय घेतला, आणि आजपर्यंत कधीच त्याचा पश्चात्ताप झाला नाही. बदली झाल्यावर माझा नवरा आधी बॆंकेची शाखा नक्की कुठे आहे हे पाहण्यासाठी एकटाच पुढे आला होता. रत्नागिरी- पणजी बसने येताना वाटेत म्हापश्याला त्याने बॆंकेचा बोर्ड पाहिला. माझी म्हापश्याला बदली झाली होती , त्यामुळे तिथल्या लोकांनाही भेटून यावं म्हणून तो सहजच बॆंकेत शिरला. ओळख झाल्यावर रहायची सोय काय म्हणून प्रश्न कोणीतरी विचारला. आता जागा शोधायची आहे म्हणताच एका स्टाफने लगेच म्हटलं. “अरे, परवा तो अमका अ…

आमचे गोंय - भाग 10 - गोव्याची खाद्यसंस्कृती

इमेज
गोव्याची खाद्य-संस्कृती. गोव्याची खाद्य संस्कृती पोर्तुगीज, स्थानिक हिंदु अशा दोन वेगवेगळ्या संस्कृतींच अनेक शतकांपासुन बनलेल एक वेगळच, पण अत्यंत सुंदर अस मिश्रण आहे. जरी इथे हिंदु आणि ख्रिश्चन धर्मांच्या प्रभावाने दोन तर्हे च्या खाद्यसंस्कृती आहेत, त्यांच्यात बरीच साम्य आहेत, आणि ह्या दोन्ही पद्धतींचा कुठे ना कुठे मिलाफ़ होतो आणि हे खाद्यसंस्कृतीच मिश्रण गोव्याच्या जेवणाला विशेष बनवतं. स्वयंपाक करण्यासाठी वापरायच्या भांड्यांमधे धातूच्या टोपांबरोबर बांबूची रोळी, मातीची भाजलेली मडकी, खापर, नारळाच्या करवंटीचे डाऊल (यांच्यामुळे कुठल्याही वाढायच्या डावेला/चमच्याला ‘दवलो’ म्हणतात) यांचा वापर सर्रास होतो. माती आणि नारळाच्या करवंटीचा आपापला खास स्वाद त्या त्या पदार्थात उतरतो. पोर्तुगीज आपल्यासोबत येताना व्यापारासाठी म्हणा किंवा त्यांच्या खाण्यासाठी म्हणा टॉमॅटो, बटाटा, काजू, अननस, पपई, मिरची सारखे अनेक पदार्थ गोव्यात घेऊन आले. स्थानिकांनी सुरवातीला हे पदार्थ स्वीकारले नाहीत, पण हळु हळु हे पदार्थ इथल्या लोकांच्या स्वैपाकघरात रुजु लागले. नंतर हळु हळु पोर्तुगीजांच्या बर्‍याच पद्धती गोवेकरांमधे …

आमचे गोंय (भाग ९) : गोव्याची सांस्कृतिक जडणघडण

इमेज
हिंदू आणि ख्रिश्चन धर्माची, चालीरीतींची मिळून एक सुंदर गुंफण गोव्याच्या समाजजीवनात आपल्याला आढळून येते. याला कारण १५१० पासून गोव्यात असलेला पोर्तुगीजांचा प्रभाव. सुरुवातीच्या काळात हा प्रभाव छळाच्या स्वरूपात होता. अगदी अलीकडच्या इतिहासात, म्हणजे १९१० नंतर खर्यात अर्थाने हिंदू ख्रिश्चन सामंजस्य गोव्यात सुरू झालं. पोर्तुगीजांच्या आगमनानंतर गोव्यात त्यानी प्रथम मुस्लिमांचं अस्तित्व संपवलं, त्यामुळे इतर ठिकाणांप्रमाणॅ गोव्यात हिंदू मुस्लिम दंगे किंवा तेढ यांचा इतिहास नाही. मुस्लिम लोकसंख्याच अगदी कमी आणि पोर्तुगीजाना भिऊन राहिलेले मुस्लिम दबून गेलेले, हे त्याचं कारण. हिंदूंवर पोर्तुगीजांकडून जे अत्याचार झाले, त्यामुळे आपला धर्म टिकवण्यासाठी गोव्यातले हिंदू जास्तच पुराणमतवादी म्हणता येतील असे झाले. ही धर्म टिकवण्यासाठी नैसर्गिक प्रतिक्रिया होती. त्याशिवाय १९६१ पर्यंत गोवा इतर भारतापासून तुटलेला होता हेही एक कारण झालं. लोकांचा देवभोळेपणा आणि सोवळं इतकं की पूजेसाठी लागणारी उपकरणंच काय, नैवैद्यासाठीची भांडी सुद्धा वेगळी ठेवतात. अगदी तूप, रवा वगैरे गोष्टी वेगळ्या ठेवतात. त्याला ‘कसलेतरी हात ल…