गोव्याची खाद्य-संस्कृती. गोव्याची खाद्य संस्कृती पोर्तुगीज, स्थानिक हिंदु अशा दोन वेगवेगळ्या संस्कृतींच अनेक शतकांपासुन बनलेल एक वेगळच, पण अत्यंत सुंदर अस मिश्रण आहे. जरी इथे हिंदु आणि ख्रिश्चन धर्मांच्या प्रभावाने दोन तर्हे च्या खाद्यसंस्कृती आहेत, त्यांच्यात बरीच साम्य आहेत, आणि ह्या दोन्ही पद्धतींचा कुठे ना कुठे मिलाफ़ होतो आणि हे खाद्यसंस्कृतीच मिश्रण गोव्याच्या जेवणाला विशेष बनवतं. स्वयंपाक करण्यासाठी वापरायच्या भांड्यांमधे धातूच्या टोपांबरोबर बांबूची रोळी, मातीची भाजलेली मडकी, खापर, नारळाच्या करवंटीचे डाऊल (यांच्यामुळे कुठल्याही वाढायच्या डावेला/चमच्याला ‘दवलो’ म्हणतात) यांचा वापर सर्रास होतो. माती आणि नारळाच्या करवंटीचा आपापला खास स्वाद त्या त्या पदार्थात उतरतो. पोर्तुगीज आपल्यासोबत येताना व्यापारासाठी म्हणा किंवा त्यांच्या खाण्यासाठी म्हणा टॉमॅटो, बटाटा, काजू, अननस, पपई, मिरची सारखे अनेक पदार्थ गोव्यात घेऊन आले. स्थानिकांनी सुरवातीला हे पदार्थ स्वीकारले नाहीत, पण हळु हळु हे पदार्थ इथल्या लोकांच्या स्वैपाकघरात रुजु लागले. नंतर हळु हळु पोर्तुगीजांच्या बर्याच पद्धती गोवेकरा...