पोस्ट्स

Earth’s Children

नमस्कार मंडळी! आज आपण Jean Marie Auel यांनी लिहिलेल्या Earth’s Children या कादंबरी मालिकेची ओळख करून घेऊया. १९८० साली या मालिकेतील पहिले पुस्तक प्रसिद्ध झाले, The Clan of the Cave Bear. यानंतर २०११ पर्यंत या मालिकेत एकूण ६ भाग क्रमाक्रमाने प्रकाशित झाले. The Clan of the Cave Bear, The Valley of Horses, The Mammoth Hunters, The Plains of Passage, The Shelters of Stone, The Land of Painted Caves एकूण सुमारे ४५०० छापील पाने मजकूर ६ खंडात विभागून लिहिण्याची प्रचंड कामगिरी श्रीमती ऑएल यांनी केली. २०१० पर्यंतच या पुस्तकांच्या एकूण साडेचार कोटी प्रती विकल्या गेल्या होत्या. बरीच वाट पाहून प्रकाशित झालेले शेवटचे पुस्तक आल्यानंतरचे आकडे मला माहित नाहीत. पुस्तकाची ओळख करून घेण्यापूर्वी लेखिकेची ओळख करून घेऊ. जीन मारी ऑएल यांचा जन्म १८ फेब्रुवारी १९३६ ला झाला. त्यांचे मूळ फिनलंडमधले, पण यु.एस्.ए. मधे स्थायिक. त्या एम्.बी.ए. झालेल्या आहेत. आणि ५६ वर्षांचे प्रदीर्घ सुखी वैवाहिक जीवन जगताना त्यांनी ५ मुलांना वाढवले आहे. Earth’s Children मालिकेतील कादंबर्याूत वर्णन केलेले कुटुंब केंद्रित वात...

कातरवेळी

कातरवेळी किनार्‍यावर फिकट वाळू अन स्तब्ध माड उभे स्तब्ध गढूळ सागर अन आभाळही भरलेले पाखरे घरट्यात परतलेली आणि थांबलेला वारा अवघे अस्तित्व जणू वाट पहाणारे अधीर, अपेक्षेत कसल्या अन अचानक अवघे चैतन्य सळसळून येते झावळ्यांतून कुंद आभाळातून मेघांना दूर सारीत येते एक लवलवती वीज वार्‍याला सापडतो त्याचा वेग आणि थेंब येतात नाचत वार्‍याचे बोट धरून तापलेली वाळू थंडावते मायेने स्वागत करते त्या पहिल्या वहिल्या थेंबांचे

प्रवास

बरेच दिवसांनी नवर्‍याबरोबर रेल्वेने एका छोट्या प्रवासाला निघाले होते . आदल्या दिवशीच पुण्याहून बसने परत आले होते आणि तत्कालमधे रिझर्व्हेशन करायलाही जमलं नव्हतं . तीन साडेतीन तासांचा प्रवास आहे , जाऊ जनरलमधे बसून म्हटलं आणि निघालो . स्टेशनवर पोचलो तर गाडी अर्धा तास लेट असल्याचं शुभवर्तमान कळलं . मग तिकीट काढून जनरलचा डबा समोर येईल अशा बेताने प्लॆटफॉर्मवरच पेपर टाकून मस्त बैठक मारली . रूळ क्रॉस करणार्‍या बर्‍याच मंडळीचं निरीक्षण करून झालं . एक पाणचट चहा पिऊन झाला . शेवट अर्धा तास उशीरा येणारी गाडी एक तास उशीरा येऊन प्लॆटफॉर्मला लागली . जनरलच्या डब्यात आधीपासूनच उभे असलेले लोक पाहिले आणि हे आपलं काम नव्हे याची खूणगाठ बांधत स्लीपरच्या डब्याकडे धाव घेतली . 4/5  डबे मागे चालत गेल्यावर एका डब्यात एक अख्खं बाक रिकामं दिसलं . टीसी येईपर्यंत बसून घेऊ म्हटलं , आणि काही मिनिटांतच टीसीसाहेब अवतीर्ण झाले . आमच्याकडे जनरलचं तिकीट आहे आणि फरकाचे पैसे भरून बर्थचं तिकीट दिलंत तर उपकार होतील असं सांगताच त्यांनी इतर काही बिनापावतीचे इ . सूचक वगैरे न बोलता पावती फाडून हातात ठेवली आणि बर्थ क्रमांक ...

ऐका गणेशदेवा तुमची कहाणी

ऐका गणेशदेवा तुमची कहाणी. निर्मळ मळे, उदकाचे तळे, बेलाचा वृक्ष, सुवर्णाची कमळे. विनायकाची देवळे, रावळे. मनचा गणेश मनी वसावा. हा वसा कधी घ्यावा? श्रावण्या चौथी घ्यावा, माही चौथी संपूर्ण करावा. संपूर्णाला काय करावे? पशा पायलीचे पीठ कांडावे. अठरा लाडू करावेत. सहा देवाला, सहा ब्राम्हणाला, सहाचं सहकुटूंब भोजन करावे. अल्प दान, महा पुण्य असा गणराज मनी ध्याइजे, मनी पाविजे, चिंतीले लाभिजे. ही पांचा उत्तरांची कहाणी पांचा उत्तरी सुफळ संपूर्ण. ********** श्रावणात प्रत्येक वारी त्या त्या वाराची कहाणी आजी वाचायची. त्या कहाणीच्या आधी ही गणेशाची कहाणी नेहमी वाचायची. आजीला तर ही कहाणी पाठच होती. कोणत्याही कामाची सुरुवात म्हणजे श्रीगणेशा करायचा तर गणपतीचे नाव घेणे परंपरेत आवश्यक समजले जाते ना, म्हणूनच ही लहानशी गणेशाची कहाणी. अगदी साधी सोपी. मोजक्या शब्दात गणपतीच्या राऊळाचे वर्णन आहे. निर्मळ मळे उदकाचे तळे. बेलाचा वृक्ष आहे. म्हणजे शिवाचे देऊळ कुठेतरी जवळपास असणार. तळ्यात सुवर्णकमळे आहेत. आणि तळ्याशेजारी विनायकाचे देऊळ आहे. गणपतीचे विनायक हे नाव पुराणांमधे आणि बौद्ध तंत्रात वापरले गेले आहे. कहाणी...

विंचुर्णीचे धडे - गौरी देशपांडे

विंचुर्णीचे धडे गौरी देशपांडेचं "एकेक पान गळावया" या बहुचर्चित पुस्तकांएवढं कदाचित प्रसिद्ध नसेल पण या पुस्तकावरही गौरीचा मोहक ठसा जाणवतोच. १९९६ चं हे पुस्तक. पुस्तक रूढ अर्थाने कोणत्र्या प्रकारात बसते माहित नाही. ही विंचुर्णीची चित्रे आहेत गौरीने रेखाटलेली. त्या चित्रांची प्रेक्षक म्हणून गौरी थोडीशी दिसते. त्याबरोबर पार्श्वभूमीला तिची मुले, नवरा हेही अधे मधे दिसतात. तशी ही आत्मकथा नव्हे पण एका महत्त्वाच्या टप्प्यावर अनुभवलेलं आयुष्य इथे गौरीने रेखाटलं आहे. या पुस्तकाची प्रस्तावना, अर्पणपत्रिका तेवढीच वाचनीय आहे. आपल्याला विंचुर्णीसारख्या खेड्यात जाऊन रहायची बुद्धी का झाली याचं सुरेख वर्णन यात आहे. याला कारण झालं गौरीच्या स्वप्नातलं कम्युन! प्रत्यक्षात त्या कम्युनमधे बरं वाईट सगळंच असणार आहे विंचुर्णीसारखं. स्वप्न बघायला हवीतच पण प्रत्यक्षात आणखीही खूप काही त्याबरोबर मिळतं. पाहिजे असलेलं आणि नको असलेलंही! पुणे मुंबईच्या गजबजाटातून बाहेर पडून दुष्काळग्रस्त विंचुर्णीला घर बांधायला कारण झाले ते गौरीचे मेव्हणे आणि बहीण. ते आधी तिथे जाऊन राहिले होते ते पाझर तलाव आणि त्यांच्या...

उकडगरे

इमेज
सध्या माझी आई माझ्याकडे आली आहे. ती आली की मी नेहमी पारंपरिक पाककृत्या तिला विचारून करत असते. त्या फेसबुकवरच्या मित्रमंडळींना बघाव्या लागतात आणि इच्छा असो नसो, चान चान म्हणावे लागते. एका कन्नड लोकांच्या ग्रुपमधे मराठी पाकृ अजिबात माहित नसल्याने त्या खूपच आवडतात असे तिथले लोक म्हणतात. ते कदाचित त्यांच्या जन्मजात सौजन्यशील स्वभावामुळे असावे. मा. स्पाजींबरोबर "कलेसाठी कला की जीवनासाठी कला" या विषयावर आमचा नेहमी फेसबुकीय वाद सुरू असतो. त्यांचे म्हणणे की पाकृचे प्रेझेंटेशन जास्त महत्त्वाचे तर मला वाटते की ती खाणे हे जास्त महत्त्वाचे. या वादाचा निकाल आजपर्यंत लागला नाही. पण त्याचा बदला घेण्यासाठी एकदा मौ भात करून मा. स्पाजींचे नाव त्यावर "टाचायचा" माझा कृतनिश्चय आहे. आजपर्यंत जेव्हा कधी मौ भात केला तेव्हा तो जास्त जीवनावश्यक वाटल्याने त्याचे छायाचित्राच्या कलाकृतीत रूपांतर न झाल्यामुळे तो प्रसंग टळला आहे. ते असो. या जाहीर वादात मा. बिका पुणेकर यांनीही एकदा "प्रेझेंटेशनचं र्‍हाऊ द्या" असे माझ्या काळजाला घरे पाडणारे उद्गार काढल्याने माझे पाकृचे प्रयोग आजपर्यंत...

आमचें गोंय- समारोप - आजचा गोवा

आजचा गोवा ६ डिसेंबर १९९२ ला आम्ही आमचं सामान घेऊन गोव्यात आलो. तो दिवस माझ्या चांगलाच लक्षात राहिलाय, कारण त्याच दिवशी अयोध्येत रामजन्मभूमीचा वाद विकोपाला जाऊन मोठाच गोंधळ झाला होता. वाटेत जागजागी पोलीस बंदोबस्त होताच. पण टीव्ही नसल्यामुळे नेमकं काय चाललंय काही कळायला मार्ग नव्हता. पण गोव्यात आल्यावर फार काही टेन्शन वगैरे जाणवलं नाही. त्यापूर्वी आमची बदली होणार हे निश्चित झाल्यावर अधिकार्‍यांनी २ पर्याय दिले होते, एक तर मुंबई किंवा गोवा. मुंबईचं आयुष्य आणि गर्दी, लोकलचा प्रवास हे सगळं आपल्याला न झेपणारं, म्हणून आम्ही गोव्यात यायचा निर्णय घेतला, आणि आजपर्यंत कधीच त्याचा पश्चात्ताप झाला नाही. बदली झाल्यावर माझा नवरा आधी बॆंकेची शाखा नक्की कुठे आहे हे पाहण्यासाठी एकटाच पुढे आला होता. रत्नागिरी- पणजी बसने येताना वाटेत म्हापश्याला त्याने बॆंकेचा बोर्ड पाहिला. माझी म्हापश्याला बदली झाली होती , त्यामुळे तिथल्या लोकांनाही भेटून यावं म्हणून तो सहजच बॆंकेत शिरला. ओळख झाल्यावर रहायची सोय काय म्हणून प्रश्न कोणीतरी विचारला. आता जागा शोधायची आहे म्हणताच एका स्टाफने लगेच म्हटलं. “अरे, परवा तो...