मधुर हलाहल


मना लागले पिसे प्रियाचे
गेह तयाचे हे नभमंडल
खूण तयाची धुंडित फिरते
जनी वनी हे सर्व धरातल ।
थकली गात्रे, प्राणहि थकले
परि मिळेना तो नभश्यामल
अश्रु भरले नयनी आणिक
मला कळेना जनकोलाहल ।
प्रेम प्रियाचे विषसम अमृत
पिउनि चेतवी उरी वडवानल
अडिच अक्षरे वाचुनि भासे
अमृताहुनि मधुर हलाहल।
("अमृताहुनी मधुर हलाहल" ह्या एका ओळीची समस्यापूर्ती करत करता  मीराबाई  सहजच आठवली आणि एक अख्खी कविताच तयार झाली!)

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

नर्मदे हर!!

प्रवासातले काही अनुभवः फतेहपूर सीकरी, दिल्ली आणि म्हैसूर बंगलोर

रणबीर राज कपूर